राम कृष्ण हरी | पाण्डुरंग हरी |
राम कृष्ण हरी | पाण्डुरंग हरी |
राम कृष्ण हरी |पाण्डुरंग हरी |

Click the PLAY button


Showing posts with label abhang. Show all posts
Showing posts with label abhang. Show all posts

Sunday, June 20, 2021

नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग


चला मंगळ वेढे पाहू ...(2)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३)....||धृ.||

वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती...
ती कथा मुखाने गाऊ...(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३)...||१||

भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी...
आदराने सुमने वाहू...(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३)...||२||

कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी...
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ...(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ...(३)...||३||

Tuesday, June 15, 2021

एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स

एक वेळा करी या दु:खा वेगळे
दुरिताचे जाळे ऊगओनि 
आठवीण पाय हा माझा नवस

रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस

बहु दुरवरी भोगविले भोग
आता पान्डुरंगा सोडवावे
आठवीण पाय हा माझा नवस

तुकाम्हणे काय करिन कुरवंडी
वोवाळुनी सान्डी मस्तक हे
आठवीण पाय हा माझा नवस

रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस